नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर आजवर रामबाण उपाय सापडलेला नाही. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हाच एक पर्याय असून यासाठी एकट्या भारतातच औषध बनविले जाते. अमेरिकेसारख्या महासत्तेपासून युरोपमधील पुढारलेल्या देशांना हे औषध पुरविण्यात येत आहे. मात्र, आता भारतीय कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे.
६ भारतीय कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले असून त्याचा माणसांवर वापर करून परीक्षण करण्यात येत आहे. या कंपन्यांनी जवळपास ७० प्रकारच्या लसी शोधल्या आहेत. त्याची चाचणी सुरु असून यातील तीन औषधे माणसावरील परीक्षणाच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहेत. जरी या कंपन्यांना लस बनविण्यात यश आले तरीही २०२१ च्या आधी हे औषध मोठ्या प्रमाणावर तयार होण्याची शक्यता फार कमी आहे.
जॉयडस कॅडिला, सीरम इन्स्टिट्यूट, बायोलॉजिकल ई, भारत बायोटेक, इंडियन इम्युनोलॉजिकल आणि मिनवॅक्स आहेत. कॅडिला ही कंपनी दोन औषधांवर काम करत आहे. जगभरात आतापर्यंत २१ लाख कोरोनाचे रुग्ण सापडे असून जवळपास १.४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
शोधकांनी सांगितले की ही एक क्लीष्ट प्रक्रिया आहे. चाचणी घेताना अनेक आव्हाने आहेत. नवीन कोरोना व्हायरस, सार्स कोव्ह-२ ची लस तयार करण्यासाठी १० वर्षे लागणार नाहीत. जसे की अन्य लसी बनविताना लागतात. मात्र, कोरोनावरील लस ही सुरक्षित, प्रभाावी आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष लागणार आहे.
विलंब कशासाठी ? केरळच्या राजीव गांधी जैव प्राद्यौगिकी केंद्राचे मुख्य वैज्ञानिक ई श्रीकुमार यांनी सांगितले की, लस विकसित करणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. यासाठी अनेक वर्षे लागतात आणि अनेक आव्हाने झेलावी लागतात. माणसांवर चाचणी करतानाही अनेक टप्पे आहेत ते पार करावे लागतात. यानंतर या लसीला मंजुरी मिळण्यासही वेळ लागतो. माणसावरील चाचणीवेळी शेकडो जणांवर त्याचा प्रभाव पाहिला जातो. तर शेवटच्या टप्प्यामध्ये हजारो लोकांवर या औषधाचा परिणाम पाहिला जातो. यासाठी काही महिने जावे लागतात.
CoronaVirus शाहीन बाग बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; दिल्लीमध्ये 24 तासांत ६२ नवे रुग्ण
आजचे राशीभविष्य - 17 एप्रिल 2020