नवी दिल्लीः कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना तात्काळ कोट्यवधींचा निधी दिला आहे. कोरोना इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम पॅकेजअंतर्गत थोडा थोडका नव्हे, तर तब्बल १५ हजार कोटींचा निधी मोदी सरकारनं राज्यांमध्ये वितरीत केला आहे. राज्य आरोग्य यंत्रणा सुधारणाच्या उद्देशाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हा संपूर्ण निधी देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी केंद्र सरकारनं इंडिया Covid19 इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम (India COVID-19 Emergency Response and Health System Preparedness Package) पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधील खर्चासाठीची संपूर्ण रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.सरकारने दिलेल्या पॅकेजशी संबंधित 5 महत्त्वाच्या गोष्टी(I) राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक वंदना गुरुनानी यांनी एक परिपत्रक जारी केले आहे की, जानेवारी २०२० ते मार्च २०२४ या कालावधीत शंभर टक्के केंद्रीय प्रकल्प टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे.(II) या प्रकल्पांतर्गत कोरोनाबाधित लोकांमधल्या विषाणूला रोखून राष्ट्रीय व राज्यस्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट केली जाणार आहे. यात वैद्यकीय उपकरणे, औषधे, इमारत प्रयोगशाळेची खरेदी आणि जैव-सुरक्षा सज्जता याला मजबूत करणे देखील समाविष्ट आहे.
Coronavirus: कोरोनाच्या लढ्यासाठी राज्यांना मोठं पॅकेज; मोदी सरकारनं दिले १५ हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 8:45 PM