नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दोन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 900 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी ज्या देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची आवश्यकता असेल त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. याच दरम्यान भारतात आणखी दोन औषधं ही कोरोना व्हायरला टक्कर देत असल्याची माहिती समोर आली आली आहे. सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सने याबाबत माहिती दिली आहे. भारतात कोरोनावरील उपचारात दोन औषधांचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
देशातील काही तज्ज्ञ डॉक्टरांचं एक टास्क फोर्स तयार करण्यात आलं आहे. कोरोनावरील औषधोपचारीची दिशा ठरवणं आणि त्यात बदल सुचवण्याचं काम त्याला देण्यात आलं आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन नंतर आता देशात Favipiravir आणि Tocilizumab ही औषधं जास्त परिणामकारक ठरल्याचं मत या टास्क फोर्समधल्या डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. भारतात जे काही प्रयोग केले गेले त्यामध्ये ही दोन औषधे प्रभावी ठरत असल्याचं आढळून आलं आहे. तर इतर काही देशांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध परिणामकारक ठरलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सध्या कोरोनावरील उपचारासाठी 19 औषधांचा प्रयोग सुरू आहे. Chlroquine, HCQ, Remdesivir, Lopinavir/Ritonavir, Baloxavir Marboxil, Darunavir, Ribavirin+IFN betam Galidesivir, Oseltamivir, Umifenovir, Camostat mesylate, Ruxolitinib, Interferon beta, Tocolizumab, Ustekinumab, Nigericin, Teicoplanin आणि Ivermectin या औषधांचा त्यामध्ये समावेश आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजार 435 पर्यंत पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 934 झाला आहेत. आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार 185 झाला आहे. त्यामुळे कोरोनाला मात देत बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!
CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत