रोहतक - देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आजपर्यंत 414 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण 12,380 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 99 जणांचा तर देशात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे.
हरियाणातील एका तरुणाने मेक्सिकन तरुणीशी लग्न केलं आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या लग्नाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. रोहतकच्या जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात हा विवाह झाला. रोहतकमध्ये राहणाऱ्या निरंजन कश्यपची तीन वर्षांपूर्वी मेक्सिकन मुलीशी ऑनलाईन मैत्री झाली होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये त्यांचा विवाह होणार होता, मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि तो विवाह सोहळा लांबणीवर पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी स्पॅनिश शिकत असताना एका अॅपच्या मदतीने निरंजन आणि डॅना यांची मैत्री झाली. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष विवाह अधिनियम (Special Marriages Act )अंतर्गत विवाह करण्याचे ठरवले. डॅना आणि तिची आई 11 फेब्रुवारी रोजी भारतात आले होते. लगेचच त्यांनी विशेष विवाह अधिनियम अंतर्गत अर्ज केला. 30 दिवसांनी लॉकडाऊनमध्ये अखेर 13 एप्रिल रोजी त्यांना जिल्हाधिकारी बोलवून घेतले आणि हा विवाह पार पडल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार
Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्...
Coronavirus : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे'
२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू