नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आजपर्यंत 450 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत 1992 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती मिळत आहे. 23 राज्यांमधील 45 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. 3 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांनी कोरोनाचा नवा रुग्ण आढळला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी शनिवारी दिली. त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून एका दिवसात तब्बल 2 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद /आयसीएमआरने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका दिवसात कोरोनाचे 2154 नवे रुग्ण आढळले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 16 हजार 365 वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत 3,54,969 लोकांच्या 3,72,123 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 16, 365 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.3 टक्के आहे. सर्वाधिक 75 टक्के मृत्यू 61 पेक्षा जास्त वय असलेल्यांमध्येच आहे. 61 ते 75 वयोगटात 33.1 तर 75 पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण 42.2 टक्के आहे. 0 ते 45 टक्के वयोगटात 14.4, 45 ते 60 वयोगटात 10.3 टक्के मृत्यूचे प्रमाण आहे. पूर्वव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण 83 टक्के आहे.
आरोग्य क्षेत्रातील अनेकांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध घेतले. अनेकांना त्यामुळे साईड इफेक्ट्स दिसल्याने सरकारची चिंता वाढली असल्याचे आयसीएमआरचे संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. एचसीक्यू औषध घेतलेल्या 10 टक्के डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पोटात दुखण्यासारखी लक्षणे दिसली. तर 6 टक्क्यांमध्ये उलटी होणे, हायपोग्लेसमिया प्रकर्षाने जाणवल्याचे त्यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईन
CoronaVirus: दिलासादायक! ४५ जिल्ह्यांमध्ये नवा रुग्ण नाही
CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’ सप्टेंबरअखेरपर्यंत आणणार कोरोनाची लस?