नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (Coronavirus Variants) उत्पत्तीच्या रहस्याचा उलगडा केल्याचा दावा विविध संशोधन संस्थामधील तज्ज्ञांनी केला आहे. प्रीप्रिंट सर्व्हर MedRxiv वर २७ जुलै रोपी प्रकाशित एका रिसर्चमध्ये संशोधकांनी सांगितले की, विषाणू एका बाधित व्यक्तीच्या शरीरामध्ये परिवर्तनाचा सामना करतो. तसेच एकदा का असे झाले की हा विषाणू आपल्यातील बदलांसह दुसऱ्या लोकांना बाधित करतो. त्यामुळे नव्या व्हेरिएंट्सचा उदय होतो. संशोधकांच्या पथकाला दिसून आले की, सुमारे ८० टक्के जीनोम सिक्वेंसिंगनंतर नवा व्हेरिएंट किंवा स्ट्रेन समोर आला आहे. ( How a new variant of the coronavirus is formed, new research reveals)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वेळोवेळी व्यक्ती आणि लोकांमध्ये असलेल्या विषाणूच्या परिवर्तनशिलतेवर नजर ठेवल्याने त्या गोष्टींबाबत आवश्यक पुरावे मिळू शकतात, ज्या फायदा किंवा नुकसान पोहोचवू शकतात. संशोधनानुसार ही माहिती पसरलेल्या विषाणूचा प्रकार आअि त्याच्या संसर्गाबाबत भविष्यवाणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. नोवेल कोरोना व्हायरसच्या जीनोमची इंट्रा होस्ट परिवर्तनशीलतेसह संयुक्त विश्लेषण हे आता पुढचे पाऊल असेल.
या रिसर्चमध्ये हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी(सीसीएमबी) सह इंस्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, दिल्ली, इंस्टिट्युट ऑफ लाइफ सायन्सेज भुवनेश्वर, अॅकॅडमी फॉर सायंटिफिक अँड इनोवेटिव्ह रिसर्च, गाझियाबाद, नॅशनल सेंटर डिजीज कंट्रोल, नवी दिल्ली आणि भारतीय प्रौद्योगिकी संस्थेचे संशोधक, जोधपूर यांनी भाग घेतला होता.
संशोधकांनी साथीच्या दोन वेगवेगळ्या काळातील कोविड-१९ रुग्णांच्या नमुन्यांचे विश्लेषण केले आहे. पहिल्या टप्प्यात संशोधकांनी चीन, जर्मनी, मलेशिया, युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि भारताच्या विविध भागातील लोकांमधून जून २०२० पर्यंत एकत्र करण्यात आलेल्या १ हजार ३४७ नमुन्यांचे विश्लेषण केले, जेणेकरून कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये जीनोम वाइड इंट्रा-होस्ट सिंगल न्यूक्लियोटाइड वैविध्याच्या मानचित्राचा आढावा घेता येईल. सिंगल न्यूक्लियोटाइड व्हेरिएशन दुसऱ्यांसाठी एक न्यूक्लियोटाइड पर्याय आहे.