नवी दिल्ली : देशात गुरुवारी कोरोनाचे ३ लाख ६२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले व ४१२० जणांचा मृत्यू झाला. बुधवारची आकडेवारी लक्षात घेता नव्या रुग्णांच्या संख्येत गुुरुवारी १४ हजारांनी वाढ झाली व मृतांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात ३ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ३७ लाखांपेक्षा अधिक झाली असून त्यातील १ कोटी ९७ लाख जण आजवर कोरोनामुक्त झाले.बुधवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३ लाख ४८ हजार होती व ४२०५ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी ३६२७२७ नवे कोरोना रुग्ण आढळले व ३५,२१८१ जण बरे झाले. कोरोना रुग्णांंची एकूण संख्या २,३७,०३,६६५ असून त्यातील १,९७,३४,८२३ जण बरे झाले. या संसर्गाने मरण पावलेल्यांची एकूण संख्या २,५८,३१७ आहे तर ३७,१०,५२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये १५.६५ टक्के इतकी वाढ झाली आहे. तसेच बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण ८३.२६ टक्के व मृत्यूदर १.०९ टक्के आहे.
जगात १ कोटी ७८ लाख रुग्णांवर उपचार सुरू - जगामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १६ कोटी ११ लाखांहून अधिक असून त्यातील १३ कोटी ८९ लाख जण बरे झाले तर ३३ लाख ४५ हजार जणांचा बळी गेलाआहे. - १ कोटी ७८ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असून त्यांची संख्या ३ कोटी ३५ लाख आहे. - त्यातील २ कोटी ६६ लाख जण बरे झाले आहेत व ५ लाख ९७ हजार जण अमेरिकेत कोरोनाचे बळी ठरले.- या देशात सध्या ६३ लाख ६८ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.- ब्राझिलमध्ये १ कोटी ५३ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ४ लाख २८ हजार जण या संसर्गामुळे मरण पावले आहेत.
यूपीएसएसी पूर्वपरीक्षा आता १० ऑक्टोबरला - देशात कोरोना संसर्गाचा वाढलेला फैलाव पाहून यूपीएससीची २७ जूनला होणारी परीक्षा आता १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. - एम्ल्पॉईज प्रॉव्हिटंड फंड ऑर्गनायझेशनमधील एन्फोर्समेन्ट ऑफिसर या पदासाठी यंदा ९ मे रोजी होणारी परीक्षा, तसेच कंबाईन्ड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामसाठी ५ मेपासून सुरू होणारी नोंदणी प्रक्रियाही पुढे ढकलली.