नवी दिल्लीः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जग आर्थिक मंदीच्या छायेत आहे. जगातल्या अनेक अर्थव्यवस्था टाळेबंदीच्या मार्गावर असून, अनेक अर्थव्यवस्थांना कितीतरी ट्रिलियन डॉलरचं नुकसान सोसावं लागत आहे. संयुक्त राष्ट्राच्या ताज्या अहवालातून हे समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, विकसनशील देशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. परंतु चीन आणि भारत याला अपवाद ठरणार असल्याचंही या रिपोर्टमध्ये अधोरेखित केलं आहे. यूएनसीटीएडीचे सरचिटणीस यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूमुळे होणारी आर्थिक घसरण अजूनही सुरूच आहे. येत्या काळात ही घसरण अधिक होईल, ज्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.चीन आणि भारताचे काय होणारसध्याची परिस्थिती पाहता जगातील गरीब आणि विकसनशील देशांना आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी सुमारे २ ते ३ ट्रिलियन डॉलर्सच्या मदतीची गरज असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास मंडळाने (यूएनसीटीएडी) म्हटलं आहे. विकसनशील देशांची ही परिस्थिती सामान्य होण्यासाठी जवळपास 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो, असेही संस्थेने रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे. जी -20 देशांच्या मते त्यांनी त्यांच्या अर्थव्यवस्थांसाठी सुमारे 375 लाख कोटी (5 लाख कोटी डॉलर्स) मदतीच्या पॅकेजची घोषणा केलेली आहे. एका मोठ्या संकटात उचललेले हे अभूतपूर्व पाऊल आहे, यामुळे या संकटाला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सामोरे जाण्यास मदत होणार आहे, असंही यूएनसीटीएडीनं सांगितलं आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट (यूएनसीटीएडी)च्या रिपोर्टनुसार 'कोविड -१९ शॉक टू डेव्हलपिंग देश: टुवर्ड्स अ व्हाट इट टेक्स' हा जगातील कार्यक्रम लोकसंख्येच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिकनं मागे पडला आहे. निर्यातदार देशांना (क्रूड तेल आणि शेती उत्पादनांची निर्यात करणारे देश आणि बरेच काही) पुढील दोन वर्षांत दोन ते तीन ट्रिलियन डॉलरच्या विदेशी गुंतवणुकीच्या घसरणीचा सामना करावा लागू शकतो.
CoronaVirus : कोरोनानं जगभरात येणार आर्थिक त्सुनामी; फक्त 'या' दोन मोठ्या देशांना फटका नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 3:09 PM