शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Coronavirus : देशात कोरोनाचा आलेख उतरता?; मुंबई अन् दिल्लीत रुग्ण संख्येत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:35 AM

दिल्लीत बुधवारी फक्त १७ नवे रुग्ण समोर आले असून, जी एप्रिल महिन्यातील कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोना बाधितांची संख्या जवळपास १२ हजारांच्या वर गेली आहे. तर देशात आतापर्यंत ३९२ लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या विषाणूचा सर्वाधिक फटका दिल्ली आणि मुंबईला बसला असून, गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. दिल्लीत बुधवारी फक्त १७ नवे रुग्ण समोर आले असून, जी एप्रिल महिन्यातील कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. त्याचप्रमाणे बुधवारीही मुंबईत नवीन रुग्णांची नोंद आदल्यादिवशीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी घटली आहे. देशात नवीन प्रकरणांमध्ये 25% घटबुधवारी नवीन प्रकरणं समोर आली असली तरी केवळ 866 नवीन रुग्ण देशात आढळून आले  होते. त्यापूर्वीचा दिवस मंगळवारपेक्षा ही आकडेवारी सुमारे 25 टक्क्यांनी कमी आहे. या आठवड्यात नवीन प्रकरणांची सर्वात कमी संख्यासुद्धा आहे. सोमवारी देशात कोरोना विषाणूचे 1200हून अधिक नवीन रुग्ण आढळले होते. मंगळवारीही सुमारे 1100 नवीन प्रकरणे नोंदली गेली होती. जर आजचा हा ट्रेंड कायम राहिला तर भारत लवकरच कोरोना विषाणूपासून मुक्तता मिळवू शकतो. दिल्लीत फक्त 17 नवीन प्रकरणे; एप्रिलमधल्या एका दिवसातील सर्वात कमी घटनामहाराष्ट्रानंतर दिल्लीत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोनाचा आलेख बर्‍याच वेगाने वाढत होता, जो बुधवारी थांबला. काल राजधानीत कोरोना विषाणूची एकूण 17 नवीन प्रकरणं समोर आली असली तरी संपूर्ण एप्रिलमध्ये कोणत्याही दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनानं दोन मृत्यू झाले, आता मृतांचा आकडा येथे 32पर्यंत पोहोचला आहे.अधिका-यांच्या म्हणण्यानुसार निजामुद्दीन मरकजच्या लोकांना वेळीच हद्दपार केल्यानं दिल्लीतील नवीन प्रकरणे कमी आली आहे. लोकांमध्ये शून्य पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले जाऊ शकते. येथे एकूण  1578 प्रकरणांपैकी 1080 म्हणजे ६८ टक्के प्रकरणं तबलिगींशी संबंधित होती. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वात कमी प्रकरणदेशातील कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसणा-या महाराष्ट्रातही बुधवारी सुधारणा झाली आणि नवीन प्रकरणांमध्ये 34 टक्क्यांपर्यंत घट झाली. बुधवारी महाराष्ट्रात एकूण 232 नवीन रुग्ण आढळून आले. गेल्या 6 दिवसांतील हे सर्वात कमी आकडेवारी असून, मंगळवारच्या तुलनेत 34 टक्के कमी आली आहे.मुंबईत नवीन प्रकरणात 35% घटमहाराष्ट्रातील सर्वात वाईट परिस्थिती मुंबईत आहे, परंतु चांगली गोष्ट म्हणजे बुधवारी नवीन प्रकरणांमध्ये 35 टक्के घट झाली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बुधवारी 140 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात कोरोनामध्ये गेल्या 11 दिवसांत झालेल्या मृत्यूची ही सर्वात कमी आकडेवारी होती, जिथे आतापर्यंत 114 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1896वर गेली आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या