शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

CoronaVirus News: लवकरच देशात कोरोनाचं दहन?; गेल्या ९८ दिवसांत जे घडलं नाही, ते काल घडलं

By कुणाल गवाणकर | Published: October 25, 2020 8:59 AM

CoronaVirus News: देशातील कोरोना वाढीचा वेग मंदावला; सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ लाखांच्या खाली

नवी दिल्ली: देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. काल दिवसभरात ५८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या ९८ दिवसांत पहिल्यांदाच इतक्या कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. देशातील विविध भागांमध्ये कोरोनाचा वेग आटोक्यात येत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कोरोनानं देशात अक्षरश: थैमान घातलं होतं. १५ सप्टेंबरला देशात कोरोनामुळे १ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काल देशात ५८० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेल्या ९८ दिवसांत प्रथमच इतक्या कमी प्रमाणात कोरोना रुग्ण दगावले.मुंबईच्या नावे कोरोना बळींची नकोशी नोंद; बनले देशातील पहिले शहरगेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. काल दिवसभरात देशात ५१ हजार २३ कोरोना रुग्ण आढळून आले. देशात आतापर्यंत ७८ लाख ६३ हजार ९१३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या घडीला ६.७५ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७० लाख ६९ हजार ९९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९.९ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.आनंदाची बातमी! कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी, कमी वेळात रुग्ण बरे होणार, तज्ज्ञांचा दावाकेरळमधील कोरोना रग्णांच्या संख्येत वाढदेशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर केरळ सरकारनं तातडीनं हालचाली सुरू केल्या. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला. मात्र आता केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काल दिवसभरात केरळमध्ये कोरोनाच्या ८ हजार २५३ रुग्णांची नोंद झाली. ....म्हणून कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवते, तज्ज्ञांचा खुलासामहाराष्ट्रातून गुड न्यूज; दिल्लीनं चिंता वाढवली दिल्लीत काल ४ हजार ११६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १८ सप्टेंबरनंतर प्रथमच दिल्लीत इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्येही कोरोना संकटाची तीव्रता वाढली आहे. काल पश्चिम बंगालमध्ये ४ हजार १४८ नवे कोरोना रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग सहाव्या दिवशी घट पाहायला मिळाली. काल दिवसभरात राज्यात ६ हजार ४१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १३७ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस