शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

काही दिवसांच्या दिलाशानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत आढळले एवढे रुग्ण, अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 11:21 AM

1,71,686 जणांवर सध्या उपचार सुरू, तर आतापर्यंत 1,54,010 जणांचा कोरोनामुळे मृत्यू...

ठळक मुद्देदेशात काही दिवसांच्या दिलाशानंतर पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ.देशात आतापर्यंत एकूण 1,07,20,048 जणांना कोरोनाची लागण.देशात आतापर्यंत 1,54,010 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

नवी दिल्ली : देशात काही दिवसांच्या दिलाशानंतर पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 18,855 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 163 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. काल 20,746 जणांनी कोरोनावर मात केली. देशात आतापर्यंत एकूण 1,07,20,048 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 1,71,686 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 1,54,010 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

दिलासादायक गोष्ट म्हणजे देशात आतापर्यंत 1,03,94,352 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 29,28,053 जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे.

महाराष्ट्रात समोर आले 2,889 नवे कोरोनाबाधित -महाराष्ट्रात 2,889 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. यानंतर आता गुरुवारी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 20,18,413 वर पोहोचली आहे. तर 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 50,944 वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आणखी 3,181 जणांनी कोरोनावर मात केली असून आता कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 19,23,187 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 43,048 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय काल गुजरातमध्ये 346 नवे रुग्ण समोर आले, तर 602 जण संक्रमणमुक्त झाले आहेत. मध्यप्रदेशात 226 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावी, दादर पुन्हा शून्यावर -कोरोनाचा प्रसार रोखण्यात जी उत्तर विभागातील दादर आणि धारावी परिसर यशस्वी ठरले आहेत. या दोन भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक अंकी असल्याचे दिसून येत आहे, तसेच आतापर्यंत तीन वेळा या भागांमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही, तर माहीममध्येही केवळ ११६ सक्रिय असल्याने जी उत्तर विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. एप्रिल महिन्यात धारावीत पहिला बाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर झपाट्याने येथील झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग वाढला. मात्र, चेस द व्हायरस, फिव्हर क्लिनिक, अशा अनेक उपक्रमांनी येथे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस