शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

CoronaVirus Update: धक्कादायक! आरटी-पीसीआर टेस्टनंही डिटेक्ट होईना कोरोना, करावे लागतेय सीटी स्कॅन; लोकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 6:37 PM

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले होते, की आरटी-पीसीआर टेस्ट कोरोनाच्या यूके, आफ्रिका, ब्राझील अथवा डबल म्यूटेंट व्हेरिएंटचा शोध घेण्यास अयशस्वी होत नाही. मात्र, सरकारच्या या दाव्याच्या अगदी उलट, सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत, की अनेक वेळा आरटी-पीसीआर टेस्टमध्येही कोरोना संक्रमणाची पुष्टी होत नाहीय. (Coronavirus in India )

नवी दिल्ली - देशभरात रोज दोन लाखहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अनेक लोक तक्रार करत आहेत, की आरटी-पीसीआर टेस्टिंग करूनही त्यांच्या नातलगांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे. यानंतर सीटी स्कॅन केल्यानंतर कोरोना संक्रमणाची पुष्टी होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे, की सीटी स्कॅन भारतात प्रत्येक प्रकारच्या कोरोना व्हेरियेंटला डिटेक्ट करूशकतो. (Coronavirus India live updates Social media users are claiming that even RT PCR test is unable to detect coronavirus)

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले होते, की आरटी-पीसीआर टेस्ट कोरोनाच्या यूके, आफ्रिका, ब्राझील अथवा डबल म्यूटेंट व्हेरिएंटचा शोध घेण्यास अयशस्वी होत नाही. मात्र, सरकारच्या या दाव्याच्या अगदी उलट, सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत, की अनेक वेळा आरटी-पीसीआर टेस्टमध्येही कोरोना संक्रमणाची पुष्टी होत नाहीय. सोशल मिडियावर काही यूझर्सनी म्हटल्यानुसार, अनेक प्रकरणांत सीटी स्कॅन केल्यानंतरच कोरोनाची पुष्टी होत आहे.

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

पेशाने पत्रकार असलेल्या विक्रांत यादव यांनी ट्विटर केले आहे, की त्यांच्या आईला कोरोनाची लक्षणं होती, यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली, मात्र आरटी-पीसीआर टेस्टमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांनी पुढे लिहिले आहे, की प्रकृती खालावल्यानंतर ते आपल्या आईला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, रुग्णालयाने कोरोना निगेटिव्ह सर्टेफिकेट असतानाही त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वी सीटी स्कॅन करायला सांगितले. यानंतर सीटी स्कॅनमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर रुग्णालयाने बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगत त्यांना उपचार न करताच घरी पाठवले.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

याच बरोबर सतीश नावाच्या एका युझरने लिहिले आहे, की 'माझ्या सासू आणि सासरे दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. माझ्या सासऱ्यांचा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव्ह आहे. तर सासूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सीटी स्कॅनमधून सासूंनाही कोरोना असल्याची पुष्टी झाली आहे. दोघांसाठीही बेड मिळेनात, कृपया मदत करा.

पंतप्रधान मोदींचे कुंभमेळा संपवण्याचे आवाहन; कंगना म्हणते - रमजानवरही घालावेत निर्बंध

...तर देशात जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढतील दैनंदिन मृत्यू -कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी तत्काळ योग्य प्रयत्न करण्यात आले नाही, तर, भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्बात लॅन्सेट कोविड-19 कमिशनकडून एका रिपोर्टमध्ये धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या रिपोर्टच्या सुरुवातीच्या समीक्षेनुसार, भारतात कोरोना व्हायरसमुळे रोज 1,750 मृत्यू होऊ शकतात. तसेच ही संख्या वाढून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 2,320 वर पोहोचू शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतhospitalहॉस्पिटल