शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

Coronavirus: आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 8:27 AM

देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेळेवर चाचणी किट्स वितरित केल्या जाऊ शकतात, यासाठी केंद्र सरकार सर्व उपाययोजना करीत आहे.

ठळक मुद्देरुग्णांची ओळख पटविण्यासाठी आणि रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्याची चाचणी करणे खूप महत्त्वाचे ठरते. भारतातील सर्व भागांमध्ये आता चाचणी किटची डिलिव्हरी करण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेळेवर चाचणी किट्स वितरित केल्या जाऊ शकतात, यासाठी केंद्र सरकार सर्व उपाययोजना करीत आहे.

नवी दिल्लीः कोरोनाच्या महारोगराईच्या संकटाचा जगाला सामना करावा लागत आहे. भारतातही कोरोनाचा फैलाव झाला असून, केंद्र सरकारांबरोबरच राज्य सरकारे त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांची ओळख पटविण्यासाठी आणि रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्याची चाचणी करणे खूप महत्त्वाचे ठरते. भारतातील सर्व भागांमध्ये आता चाचणी किटची डिलिव्हरी करण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे.देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेळेवर चाचणी किट्स वितरित केल्या जाऊ शकतात, यासाठी केंद्र सरकार सर्व उपाययोजना करीत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(आयसीएमआर)ने दररोज संपूर्ण देशात सुमारे 1 लाख चाचण्या करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. या महत्त्वपूर्ण कामात भारतीय डाक विभाग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 1,56,000 पोस्ट ऑफिसच्या भव्य नेटवर्कसह भारतीय पोस्ट ऑफिस पुन्हा एकदा कोरोना वॉरियर्स बनले आहे.आधार प्रणालीद्वारे लोकांना घरोघरी पैसे पाठविण्याचे काम करणाऱ्या भारतीय पोस्ट ऑफिसनं आता कोरोना साथीच्या आजारात लोकांची सेवा सुरू केली आहे. इंडिया पोस्ट आपल्या 16 प्रादेशिक ऑफिसमधून कोरोना चाचणी किट देखील डिलिव्हरी करणार आहे. त्यासाठी आयसीएमआरबरोबर एक करारही करण्यात आला आहे. देशातील आयसीएमआरने ठरवून दिलेल्या 200 अतिरिक्त लॅबसाठी भारतीय पोस्ट ऑफिस टेस्ट किट्सचा पुरवठा करणार आहे. या सर्व प्रयोगशाळांना कोरोनाची चाचणी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयावर कायदामंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, आयसीएमआर आणि टपाल विभाग यांच्यातील या कराराचे मी स्वागत करतो. टपाल विभाग लोकांना पत्रे, औषधे, आर्थिक मदत यांसारख्या सुविधा देत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान, गरजूंना अन्न आणि रेशन देण्याचे देखील काम करीत आहे. अशा कठीण काळात आपले पोस्टमन देशाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.करारानुसार टेस्टिंग किट पोस्टल विभागाच्या ऑफिसमध्ये येताच ती वेगवेगळ्या राज्यांच्या संबंधित प्रयोगशाळांमध्ये वेळेवर पाठवण्यात येणार आहेत. हे आगार 16 पोस्टल मंडळे किंवा राज्यांचं मिळून बनलेलं आहे. टपाल विभाग आणि आयसीएमए डून या कामासाठी नोडल अधिका-यांचीही नेमणूक करण्यात आली आहे, जेणेकरून वेळेवर टेस्टिंग किट पोहोचवता येतील. वेळोवेळी चाचणी किट्स संबंधित प्रयोगशाळेत पोहोचतात, त्यास प्राधान्य दिले गेले आहे. इंडिया पोस्टने काही चाचणी किटची डिलिव्हरी देखील सुरू केली आहे. कोलकाता, भुवनेश्वर, रांची, पटना, जोधपूर, अजमेर, झालावार, उदयपूर, कोटा, डूंगरपूर, चूरू, गुवाहाटी ते इंफाळ आणि आयजल येथून कसोटी किट पाठविली जात आहेत. किट्स खराब होऊ नयेत म्हणून ती बर्फाने पॅक केली जातात. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसcorona virusकोरोना वायरस बातम्या