नवी दिल्ली - भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. रविवारी देशभरात पुन्हा एकदा आठ हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ९० हजार ५३५ झाली आहे. तसेच आतापर्यंत देशात ५ हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९१ हजार ८१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी देशभरात कोरोनाचे ८ हजार ३९२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ९० हजार ५३५ वर पोहोचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशामध्ये २३० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार १९४ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४ हजार ८३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १ लाख ९० हजारांचा टप्पा ओलांडल्याने भारत जर्मनी आणि फ्रान्सला मागे टाकत कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानी पोहोचला आहे. आता केवळ अमेरिका, ब्राझील, रशिया, युनायटेड किंग्डम, स्पेन आणि इटली या देशांमध्येच भारतापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी आजपासून देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. मात्र देशात आता सामुहिक संक्रमणाचा धोका वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी दावा केला आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ९० हजारांच्या वर पोहचला आहे तर ५ हजारापर्यंत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, देशात अनेक झोनमध्ये कोरोनाचं सामुहिक संक्रमण सुरु झालं आहे. त्यामुळे सध्या कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश मिळत आहे हे मानणं चुकीचे ठरेल. तसेच या टास्कफोर्सने कोरोना रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजनांवर टीकास्त्रही सोडलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी
क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...
शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी