नवी दिल्ली : वेळेत लॉकडाउन केले नसते तर देशात आतापर्यंत १ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती. परंतु वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे तूर्त कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, अशी भावना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. सकारात्मक बाब म्हणजे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी सरासरी १० दिवसांवर आल्याने कोरोनाविरोधातील लढाईस मोठे बळ मिळाले आहे. देशात लागू केलेल्या लॉकडाउनला एक महिना पूर्ण होत असतानाच ही बाब पुढे आली आहे.रुग्ण दुप्पट होण्याचा चार दिवसांपूर्वी हा दर ७ दिवस होता. २१ मार्च रोजी ३ दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत होते. पुढच्या तीनच दिवसांत (२३ मार्च) दुप्पट होण्याचा वेग ५ दिवसांवर आला होता. जनता कर्फ्यू त्यादरम्यान झाला होता, असे निती आयोगाचे सदस्य डा. वी. के. पॉल यांनी आवर्जून नमूद केले. मधल्या काळात मात्र दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाला होता. पॉल म्हणाले की, अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यावर नियंत्रण आले आहे. आज दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ९ दिवस आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे.८० जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाहीगेल्या १४ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण न आढळणाऱ्या जिल्ह्यांची सख्या ८० वर गेल्याने आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेगही १० वर आला असल्याने लॅकडाउन यशस्वी होताना दिसत आहे. तीन राज्यांमध्ये ४ आंतरमंत्रालय अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात आले आहे. हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद व सूरतमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात आले आहे.२४ तासांत १६८४ रुग्ण; एकूण बाधित २४,४४७गेल्या २४ तासांत (गुरुवार) १६८४ नवे रुग्ण देशभरात आढळले. रुग्णसंख्या २४ हजार ४४७ वर गेली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. आतापर्यंत ४७४८ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण २०.५७ टक्क्यांवर गेले आहे.
CoronaVirus: "...तर आज देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख असता"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 6:32 AM