नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी घट नोंदवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक लाखांच्या आत असलेले नव्या रुग्णांचे प्रमाण आता ८० हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक राहिले आहे. (Coronavirus In India) मात्र चिंतेची बाब म्हणजे देशातील दैनंदिन मृत्यूंची संख्या मात्र अद्यापही तीन हजारांच्या वर नोंदवली जात आहे. (India reports 80,834 new COVID-19 cases, 1,32,062 patient discharges, and 3,303 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry)आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या ८० हजार ८३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात देशात कोरोनामुळे तीन हजार ३०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १ लाख ३२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण अधिकच घटले आहे.
Coronavirus: दिलासा कायम, गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, कोरोनामुक्तांचे प्रमाणही वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 9:46 AM