शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

कोरोनाची भीती! सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'या' 5 देशांतून येणाऱ्यांसाठी RT-PCR आवश्यक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 1:05 PM

Coronavirus : या देशांतील कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट (Coronavirus) पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) अलर्टवर असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. 

या देशांतील कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे. तसेच, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरोग्य स्थितीची माहिती देण्यासाठी कोविड-19 हवाई सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय फ्लाइटमधून येणाऱ्या काही प्रवाशांची शनिवारपासून रँडम कोरोना व्हायरस टेस्ट केली जाईल. शुक्रवारी या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, क्रू मेंबर्सना यासाठी निवडलेल्या प्रवाशांना विमानतळावरील स्क्रीनिंग सुविधेत आणावे लागेल. चीन आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे सरकारने प्रत्येक फ्लाइटमधील एकूण प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांच्या आगमनानंतर विमानतळावर रँडम टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर, विमानतळ संचालकांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या रँडम टेस्टसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील, असे मंत्रालयाने सांगितले आहे. तर मुंबई विमानतळाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस टेस्टिंगसाठी सहा रजिस्ट्रेशन काउंटर आणि तीन सॅम्पलिंग बूथ तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत म्हणजे देशात 201 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे.

प्रशासनाकडून तयारी, मार्गदर्शक सूचना जारीजगभरात सध्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरिएंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे. देशात शुक्रवारी देशात कोरोनाचे 163 नवीन रुग्ण आढळले होते तर, कोरोनामुळे गेल्या 24 तासात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यानंतर एकूण मृतांचा आकडा आता 5 लाख 30 हजार 690 वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनHealthआरोग्य