नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५६ लाखांच्या पुढे गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार १६ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८५९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसातला हा सर्वोच्च आकडा होता. मात्र त्यानंतर हा आकडा खाली येऊ लागला आहे. वर्ल्डोमीटरच्या संकेतस्थळावरील आकडेवारी पाहता गेल्या सात दिवसांत देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान१६ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८५९ कोरोना रुग्ण आढळले. १७ सप्टेंबरला ९६ हजार ७९३ रुग्णांची नोंद झाली. १८ सप्टेंबरला ९२ हजार ७८९, १९ सप्टेंबरला ९२ हजार ७५५, २० सप्टेंबरला ८७ हजार ३८२, २१ सप्टेंबरला ७४ हजार ४९३, २२ सप्टेंबरला ८० हजार ३९१ आणि २३ सप्टेंबरला ८३ हजार ३४७ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे १६ सप्टेंबरनंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होताना दिसत आहे. "चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोपएका बाजूला नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत भारतानं अमेरिकाला मागे टाकलं आहे. देशातील ४५ लाख ८७ हजार ६१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ४३ लाख ४६ हजार ११० इतकी आहे. भारीच! सिरम इन्स्टिट्यूटने बनवली CDX-005 नेझल स्प्रे कोरोना लस; उत्पादनाला सुरूवातदेशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दररोज होणाऱ्या चाचण्यांची संख्या वाढत आहे. सध्या देशात दररोज १२ लाख कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. 'देशाची कोरोना चाचण्यांची क्षमता प्रतिदिन १२ लाखांवर गेली आहे. आतापर्यंत देशात ६.५ कोटी चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्यानं कोरोना रुग्ण लवकर आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणं शक्य झालं आहे,' असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.
CoronaVirus News: देशातील कोरोनाची लाट ओसरतेय?; बघा, आकडेवारी काय सांगतेय
By कुणाल गवाणकर | Published: September 23, 2020 2:54 PM