शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

CoronaVirus: एकाच दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा 29 हजारहून 43 हजारवर; आता 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 11:22 AM

Coronavirus india : बुधवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या आंकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 43,654 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 41,678 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

नवी दिल्ली - देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता केरळने देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासांत देशात 43,654 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 640 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या एकूण नव्या रुग्णांपैकी अर्ध्यावर रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले आहेत. केरळात मंगळवारी तब्बल 22,129 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. 29 मेनंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. (Coronavirus india today 50 percent of new corona cases registered in kerala data corona third wave)

बुधवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या आंकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 43,654 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 41,678 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 3,99,436 एवढी आहे. तर बऱ्या होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 3,06,63,147 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे तब्बल 4,22,022 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मंगळवारी आलेल्या आकडेवारीनुसार, 132 दिवसांनंतर पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांचा आकडा 30 हजारच्या खाली आला होता. यात एका दिवसात 29,689 नवे रुग्ण समोर आले होते.

CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित!

केरलमधील कोरोना संक्रमण दर 12 टक्क्यांवर - केरलमध्ये मंगळवारी तब्बल 22,129 नवे रुग्ण समोर आले. यानंतर आता येथील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या वाढून 33,05,245 वर गेली आहे. राज्यात गत 24 तासांत 156 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या वाढून 16,326 वर पोहोचली आहे. मंगळवारी 13,145 रुग्ण बरे झाले असून एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 31,43,043 वर पोहोचला आहे. राज्यात 1,45,371 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

या पाच राज्यांत आढळले सर्वाधिक नवे कोरोना बाधित -- केरल- 22,129 मामले- महाराष्ट्र- 6,258 मामले- मिजोरम- 1,845 मामले- तमिलनाडु- 1,767 मामले- ओडिशा- 1,629 मामले

CoronaVirus Live Updates : अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा विस्फोट! एका दिवसात 1 लाख नवे रुग्ण; डेल्टा व्हेरिएंटने वाढवली चिंता

महाराष्ट्रातील नव्या रुग्णांची संख्या 6 हजारच्या पुढे -महाराष्ट्रात मंगळवारी 6,258 नवे रुग्ण समोर आले. यानंतर, एकूण संक्रमितांचा आकडा वाढून 62,76,057 पर्यंत पोहोचला आहे. तर 254 जणांच्या मृत्यूनंतर, मृतांची संख्या वाढून  1,31,859 वर पोहोचली आहे. मंगळवारी 12,645 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 60,58,751 लोक संक्रमणमुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 82,082 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKeralaकेरळ