शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

CoronaVirus News: ...अन् भारत 'त्या' यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला; नावावर नकोसा विक्रम नोंदला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 10:45 PM

कोरोना रुग्णांच्या यादीत भारत जगात नवव्या स्थानावर

नवी दिल्ली: देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असूनही कोरोना बाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६० हजारांच्या पुढे गेली आहे. यामुळे भारताच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदला गेला आहे. आशियातील देशांचा विचार केल्यास कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या जगातील केवळ आठच देशांमधील कोरोना रुग्णांचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे.worldometers.info हे संकेतस्थळ जगभरातल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी देतं. भारतात सध्याच्या घडीला कोरोनाचे १ लाख ६० हजार ३१० रुग्ण आहेत. आशिया खंडात इतकी रुग्णसंख्या कोणत्याही देशात नाही. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आतापर्यंत १ लाख ५८ हजार ३३३ रुग्ण सापडल्याची माहिती दिली आहे. यातील ६७ हजार ६९१ जण बरे झाले असून ४ हजार ५३१ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मंत्रालयानं दिली.

देशात सध्या ८६ हजार ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ५६ हजार ९५८ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडू (१८ हजार ५४५), दिल्ली (१५ हजार ५२७), गुजरात (१५ हजार १९५) या राज्यांचा क्रमांक लागतो. 
आशियाई देशांचा विचार केल्यास भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तुर्कस्तान (१ लाख ५९ हजार ७९७), इराण (१ लाख ४३ हजार ८४९), चीन (८२ हजार ९९५), सौदी अरब (८० हजार १८५), पाकिस्तान (६१ हजार २२७), कतार (५० हजार ९१४), बांगलादेश (४० हजार ३२१), सिंगापूर (३३ हजार २४९), संयुक्त अरब अमिरात (३२ हजार ५३२) यांचा क्रमांक लागतो.'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर'लेटर्स टू मदर'; मोदींनी आईला लिहिलेल्या पत्रांवरील पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या