देशात कोरोनाच्या लाटेने (CoronaVirus Second Wave) किती भयानक आणि भयावह रुप धारण केले आहे याचा प्रत्यय आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून येत आहे. देशात दर दिवशी सकाळी कोरोनाबाधितांची (Corona Patient) आकडेवारी जाहीर केली जाते. दरदिवशीच्या आकडेवारीमध्ये आज सर्वाधिक वाढ झाली आहे. तसेच दरदिवशीच्या मृतांचा आकडाही आज सर्वाधिक नोंदविला गेला आहे. (India reports 3,60,960 new #COVID19 cases, 3293 deaths and 2,61,162 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry)
देशात गेल्या 24 तासांत 3,60,960 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तर 3293 मृत झाले आहेत. मृतांचा हा आकडा आजवरचा सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत देशात 2,61,162 रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकूण बळींच्या आकड्याने दोन लाखांचा टप्पा पार केला असून हा आकडा 2,01,187 झाला आहे. देशात सध्या 29,78,709 उपचार घेत असून 1,79,97,267 एकूण कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात आजवर 14,78,27,367 लसीकरण झाले आहे.
काल कमी झालेली रुग्णसंख्यादेशात मंगळवारी 3,23,144 नवे रुग्ण सापडले होते. तर मृतांचा आकडाही काहीसा घसरून 2771 झाला होता. आणखी एक दिलासा देणारी बाब म्हणजे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही 32,555 ने वाढले होते. दिवसभरात 2,51,827 रुग्ण बरे झाले होते.
१८ ते २५ एप्रिलमध्ये देशात २२ लाख नवे रुग्णदेशात १८ ते २५ एप्रिल या काळात २२ लाख ४९ हजार नवे रुग्ण वाढले तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ लाखांहून अधिक झाली. तसेच या कालावधीत कोरोनामुळे १६ हजार जणांचा बळी गेला आहे. या आठवड्यात देशात इतके रुग्ण वाढले की तो विश्वविक्रमच झाला. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर मात्र अद्यापही १.१३ टक्के इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८२.६ टक्के आहे.