गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपासून तब्बल तीन लाखांच्या वर रुग्णांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडत आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधांचीही गरज भासत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी काही देशांनी हात पुढे केला आहे. यापैकी ऑस्ट्रेलियानंदेखील भारताला मदतीचं आश्वासन दिलं आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारतासोबत ऑस्ट्रेलियाही उभा आहे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी सांगितलं. "भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसाठी त्यांच्यासोबत उभा आहे. भारत किती खंबीर आहे हे आम्हाला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी या जागतिक आव्हानावर एकत्र काम करत राहू," असं स्कॉट मॉरिसन म्हणाले.
Coronavirus in India : भारतातील मित्रांसाठी आम्ही तयार; ऑस्ट्रेलियानंही पुढे केला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 8:15 PM
सध्या देशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. गेल्या काही दिवसांपासून दिवसाला होत आहे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
ठळक मुद्देसध्या देशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंदगेल्या काही दिवसांपासून दिवसाला होत आहे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद