शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

CoronaVirus News: छोटंसं यंत्र करणार मोठी कामगिरी; बजावणार सोशल डिस्टन्सिंग राखण्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 11:54 AM

CoronaVirus News: सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल याची काळजी घेणाऱ्या यंत्राची निर्मिती

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. चाचण्या वाढवणं आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं यामुळेच कोरोनाचा फैलाव रोखणं शक्य असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनांमधून समोर आलं आहे. त्यामुळे आता रेल्वेचे कर्मचारी एका खास यंत्राचा वापर करणार आहेत. हे यंत्र कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग राखण्यास मदत करेल. रेल्वेच्या दक्षिण विभागातल्या थिरुअनंतपुरम डिव्हिजननं एक खास यंत्र तयार केलं आहे. हे यंत्र कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आठवण करून देईल. रेल्वे कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांच्या सुरक्षेसाठी हे यंत्र तयार करण्यात आल्याची माहिती दक्षिण रेल्वेकडून देण्यात आली. या यंत्राचा वापर करणारे दोन किंवा त्याहून जास्त कर्मचारी एकमेकांपासून ते दोन-तीन मीटरवर आल्यास यंत्रातून अलार्म वाजेल. कर्मचारी एकमेकांपासून तीन मीटरपेक्षा जास्त अंतर दूर जाईपर्यंत यंत्रातून येणारा अलार्म सुरूच राहील.सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल याची काळजी घेणाऱ्या यंत्र फारसं महाग नाही. या यंत्राची किंमत ८०० रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. एकदा बॅटरी संपल्यानंतर हे यंत्र चार्जरच्या मदतीनं पुन्हा चार्ज करता येतं. एकदा चार्ज केल्यावर हे यंत्र १२ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतं. एनआरएफ२४एल०१ ट्रान्सिव्हर, अर्ड्युनो प्रो-मिनीच्या मदतीनं या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. 

सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आठवण करून देणारं, ते पाळलं जाईल याची काळजी घेणारं यंत्र वापरण्यास अतिशय सोपं आहे. आपल्या आसपास सक्रिय असलेल्या यंत्रांची माहिती घेऊन या यंत्रातून अलार्म वाजतो. या यंत्राची रेंज दोन-तीन मीटर इतकी आहे. या यंत्रामध्ये रेडिओ फ्रिक्वन्सी सिग्नल यंत्रणा वापरण्यात आली आहे. अतिशय स्वस्त असणाऱ्या या यंत्राचं वजन केवळ ३० ग्राम इतकं आहे.रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रात सिंगल चिप ट्रान्सिव्हरचा वापर करण्यात आला आहे. यंत्राकडून वापरण्यात येणारा करंट अतिशय कमी आहे. यामध्ये पॉवर डाऊन आणि स्टँडबायचे पर्याय उपलब्ध असल्यानं बॅटरी वाचवण्यास मदत होते. आकारानं लहान असलेल्या, पण मोठी कामगिरी बजावणाऱ्या यंत्रात अर्ड्युनो प्रो-मिनी मायक्रोकंट्रोलरचा वापर करण्यात आला आहे. त्याला १४ डिजिटल इनपुट/आऊटपुट पिन्स आहेत. याशिवाय रिसेट बटन, सहा ऍनालॉग इनपुट्स देण्यात आले आहेत. प्रो मिनीच्या दोन आवृत्ती आहेत. त्यातील एक ३.३ व्होल्ट आणि ८ मेगाहर्ट्झ, तर दुसरी ५ व्होल्ट आणि १६ मेगाहर्ट्झवर चालते.यंत्रामध्ये ७ व्होल्ट ५०० मिलिऍम्पेर लिथियम पॉलिमर बॅटरी असून ती लिपो रिचार्जेबल आहे. लिपो किंवा लिपोली म्हणून ओळखली जाणारी ही बॅटरी अतिशय हलकी आणि शक्तीशाली असते. या बॅटरीची क्षमता ५०० मिलिऍम्पेर इतकी आहे.मजुरांना रोजगार देण्यासाठी विद्यार्थ्याचे अ‍ॅप; स्थलांतरितांना मदतीचा हातस्थलांतरित मजुरांना काम देण्यासाठी उद्योजकांना त्यांच्याशी संपर्क साधता यावा याकरिता नॉयडामधील अक्षत मित्तल या १७ वर्षे वयाच्या विद्यार्थ्याने भारत श्रमिक नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यावर लाखो स्थलांतरित मजूर विविध राज्यांत अडकून पडले होते. गावी परतताना मजुरांचे विलक्षण हाल झाले होते.स्थलांतरित मजूर गावी परतले असले तरी त्यातील बहुतेकांच्या हातात रोजगार नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा शहरात कामधंद्यासाठी परतण्याची इच्छा आहे. अशा मजुरांना काम देऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांना त्यांच्याशी भारत श्रमिक अ‍ॅपच्या माध्यमातूनही संपर्क साधता येणार आहे. त्यासाठी अक्षत मित्तल याने भारतश्रमिक डॉट इन ही वेबसाइट वडील आशिष मित्तल यांच्या मदतीने सुरू केलीे. रोजगाराच्या शोधात असलेल्या स्थलांतरित मजुरांनी आपल्या कौशल्याची माहिती घरचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आदी तपशील या वेबसाइटवर द्यायचा आहे. अनेक स्थलांतरित मजुरांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी अक्षत मित्तल याने एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. त्यावर या मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार तो तपशील या वेबसाइटवर झळकविण्यात येईल. स्थलांतरित मजुरांकडील कौशल्य व इतर तपशील उद्योजक भारतश्रमिक डॉट इन या वेबसाइटवर किंवा अ‍ॅपवर पाहून त्यांना आवश्यक वाटणाऱ्या मजुरांना नोकऱ्या देऊ शकतील.

(‘फेसबुक’ने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवाप्रभाव नाही.)

टॅग्स :Positive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे