नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ७५,८२९ नवे रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या ६५ लाखांवर पोहोचली आहे. या संसर्गातून आतापर्यंत ५५ लाख जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आणखी ९४० जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या १,०१,७८२ झाली आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६५,४९,३७३ आहे तर या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ५५,०९,९६६ वर पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ८४.१३ टक्के आहे.देशात सध्या ९,३७,६२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १४.३२ टक्के इतके आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५५ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,७१८, कर्नाटकमध्ये ९,२१९, उत्तर प्रदेशात ५,९७७, आंध्र प्रदेशमध्ये ५,९४१, दिल्लीमध्ये ५,४७२, पश्चिम बंगालमध्ये ५,१३२, पंजाबमध्ये ३,५६२, गुजरातमध्ये ३,४८७ इतकी आहे.कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ७६ लाख आहे. या क्रमवारीत दुसºया स्थानावर असलेल्या भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ११ लाखांनी कमी आहे. तर क्रमवारीत तिसºया स्थानी असलेल्या ब्राझीलमध्ये ४९ लाख कोरोना रुग्ण आहेत. भारतामधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आॅक्टोबर महिन्यात अमेरिकेपेक्षा अधिक होणार, असे भाकीत काही संशोधकांनी संख्याशास्त्राचा आधार घेऊन वर्तविले होते. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येकडे साºया जगाचेही लक्ष लागले आहे.7.89 कोटी चाचण्याआयसीएमआरच्या माहितीनुसार ३ आॅक्टोबर रोजी देशात 11,42,131 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे चाचण्यांची एकूण संख्या झाली आहे7,89,92,534.गोव्यात कोरोना मृत्यूदर राष्ट्रीय प्रमाणानजीकआजच्या तारखेला राष्ट्रीय स्तरावरील प्रमाण हे निम्म्यापेक्षा अधिक घटून 1.8 टक्क्यावर आले आहे. गोव्यात दोन महिन्यांपूर्वी कोविड मृत्यूचे प्रमाण हे०.6 टक्के म्हणजे अर्ध्या टक्क्याच्या आसपास होते. आता ते दुप्पट होऊन १.३ टक्क्यावर पोहोचले आहे. हे असेच चालू राहिले तर गोव्यात कोविड मृत्यूचे प्रमाण हे राष्ट्रीय प्रमाणाशी केवळ बरोबरी साधणार असे नाही, तर त्यापेक्षाही अधिक वर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण २४ तासांत १२ जणांचे मृत्यू होण्याचे प्रकार सलग दोन वेळा घडले आहेत.राष्ट्रीय स्तरावर कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे दोन महिन्यांपूर्वी ५ टक्के इतके प्रचंड होते, तर गोव्यात ते अर्ध्या टक्क्याहून कमी होते.तीन महिन्यांपूर्वी २४ तासांत दोन किंवा ३ मृत्यू होण्याचे प्रमाण होते. हे प्रमाण ८ ते ९ बळींवर पोहोचल्यानंतर कोविड इस्पितळाचा ताबा हॉस्पिसियो इस्पितळाकडून काढून घेऊन तो गोवा मेडिकल कॉलेजकडे (गोमेकॉ) सोपविला होता. मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा मुख्य उद्देश ठेवून हा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला होता. ताबा गोमेकॉकडे गेल्यावर कोविड बळींचे प्रमाण कमी तर झाले नाहीच, उलट ते वाढून १२ बळींवर पोहोचले आहे.
CoronaVirus News: देशात रुग्णसंख्या ६५ लाखांवर; ५५ लाख लोेक बरे झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 1:22 AM