नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी देशभरात 3 मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस सायलंट किलर ठरत आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 16,000 हून अधिक झाली आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी देश सज्ज असून सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी केली जात आहे. कोरोनाच्या 66 टक्के पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाचं एकही लक्षण दिसले नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आतापर्यंत आढळलेल्या जवळपास दोन तृतियांश रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. मात्र असे असूनही त्यांची चाचणी ही पॉझिटिव्ह येत आहे. म्हणजेच कोरोना एक सायलंट किलर बनत असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील 3645 रुग्णांपैकी 65% रुग्ण असे आहेत, ज्यांच्यामध्ये कोरोनाचं एकही लक्षण दिसले नाही. उत्तर प्रदेशात 974 प्रकरणांपैकी 75% रुग्णांमध्ये लक्षणे दिसली नाहीत. तर आसाममध्ये 34 प्रकरणांपैकी 82% रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिश्वा सर्मा यांनी देखील अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र त्यांच्याच लक्षणे दिसत नसल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रविवारी 186 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. पण असे असूनही ते पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. तर डॉक्टरांनी रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दर्शविणे किंवा न दर्शविण्यामागील अनेक कारणे असू शकतात असं म्हटलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील व्हायरसचे प्रमाण, त्याची रोग प्रतिकारशक्ती आणि रुग्णाचे वय यानुसार वेगवेगळी कारण देखील कारणीभूत ठरू शकतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रात 283 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर
Coronavirus : देशातील 'या' झोनमधील नागरिकांना दिलासा! आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू जाणून घ्या
धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी
Coronavirus : धोका वाढला! देशातील 'या' 10 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक
Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...