नवी दिल्ली : काही गुरूंसह २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस’चे (इस्कॉन) उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील मंदिर सील करण्यात आले आहे.ऐन गोकुळाष्टमीत मंदिर सील झाल्याने भाविकांची निराशा झाली आहे. एका शासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, इस्कॉनच्या लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले असून मंदिरही सील करण्यात आले आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी वृंदावनमधील चंद्रोदय मंदिराने ‘आभासी वृंदावन धाम यात्रे’चे नियोजन केले होते. तथापि, कोरोनामुळे या कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आली आहे. गोकुळाष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.आभासी यात्रा रद्दप्रशासनाने बंदी घातलेल्या या आभासी वृंदावन धाम यात्रेत वैष्णोदेवी मंदिर, वृंदावन चंद्रोदय मंदिर, प्रेम मंदिर, इस्कॉन मंदिर, कृष्ण-बलराम वृक्ष, कालिया दाह घाट, मदन मोहन मंदिर, बांके बिहारी मंदिर, राधा-दामोदर मंदिर, निधिवन मंदिर, राधा-गोपीनाथ मंदिर, चीर घाट यांचे दर्शन भाविकांना घडविले जाणार होते. झुम अॅप किंवा यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून भाविकांना ही यात्रा अनुभवता येणार होती.
CoronaVirus News: २२ जण पॉझिटिव्ह; इस्कॉनचे मंदिर सील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 1:47 AM