कानपूर - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कानपूरच्या सरसौल येथे एक धक्कादायक घटना घडली. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर एकाची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र कोरोना रिपोर्ट येण्याआधीच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्याची तब्येत पुन्हा बिघडल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल रोजी रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्याची प्रकृती आणखी खराब झाल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य वैद्यकीय अधिकारी अशोक कुमार शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाचे रिपोर्ट न पाहता त्याला कसा डिस्चार्ज देण्यात आला याची चौकशी केली जात आहे. तपासणीनंतर कारवाई केली जाईल. कानपूरमध्ये संक्रमित होण्याचे प्रमाण 200च्या वर गेली आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी चार कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट चुकून निगेटिव्ह समजून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तामिळनाडूमधील विल्लूपूरमच्या रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली होती. चार कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयातील रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी चुकून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह दाखवण्यात आला आणि त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र नंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली. हा प्रकार समोर आल्यावर तातडीने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा शोध घेण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : लय भारी! Youtube च्या मदतीने 'या' फुलांपासून तयार केलं स्वस्त आणि मस्त सॅनिटायझर
Coronavirus : बापरे! मास्क लावला नाही तर तब्बल 8 लाखांचा दंड, 'या' देशाने घेतला निर्णय
Irrfan Khan Passed away: हरहुन्नरी अभिनेता इरफान खानची अकाली 'एक्झिट'; बॉलिवूडला मोठा धक्का