बेंगळुरू: कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, कोरोनामुळे होणारे मृत्यूंचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्र, गोवाप्रमाणे कर्नाटकमध्येही लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, कर्नाटकच्या एका मंत्र्यांने खळबळजनक दावा केला आहे. कर्नाटकच्या या मंत्र्यांने केलेल्या दाव्यानुसार, कोरोनाचे जवळपास ३ हजार रुग्ण बेपत्ता झाले आहेत. (karnataka minister claims that three thousand corona patients missing in bengaluru)
कर्नाटकचे महसूल मंत्री ए. अशोक यांनी बुधवारी एक धक्कादायक दावा केला आहे. ए. अशोक यांनी बंगळुरूमधील दोन ते तीन हजार करोना रुग्ण बेपत्ता असल्याचं म्हटले आहे. या दोन ते तीन हजार रुग्णांनी आपले मोबाइल फोन बंद ठेवले असून काहींनी घर सोडून पलायन केले आहे, असाही दावा अशोक यांनी केला आहे.
मारुतीचे अनेक प्रकल्प तात्पुरते बंद; आता कंपनी ऑक्सिजनची निर्मिती करणार
बेंगळुरूतील हजारो रुग्ण बेपत्ता
देशाची बडी आयटी सीटी मानल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये असा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माझ्या मते दोन ते तीन हजार करोनाबाधित लोकांनी त्यांचे मोबाइल बंद ठेऊन, घर सोडले आहे. ते नक्की कुठे गेलेत आम्हाला ठाऊक नाही. या व्यक्तींनी स्वत:चे फोन सुरू ठेवावेत. असे वागल्याने करोना रुग्णांची संख्या वाढत राहणार आहे. म्हणून या व्यक्तींना हात जोडून विनंती करतो की, त्यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन अशोक यांनी केले आहे.
सर्वांना वेळेत लस मिळावी, यासाठी योग्य नियोजन करावे: नाना पटोले
कर्नाटकमध्ये कोरोनाचे ३१ हजार ८३० नवे रुग्ण
कर्नाटकमध्ये कोरोनाचे ३१ हजार ८३० रुग्ण आढळून आले असून १८० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बंगळुरू शहरात सर्वाधिक म्हणजेच १७ हजार ५५० रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकात मंगळवार रात्रीपासून १४ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही लॉकडाउन लावत आहोत. सर्वांनी नियमांचे पालन करावे, सरकारला सहकार्य करावे, घरात थांबवे आणि अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केले आहे.
RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार; ECI चा नवा नियम
दरम्यान, गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालयांवर वाढलेला ताण लक्षात घेता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी लॉकडाऊनची घोषणा केली. गुरुवारी सायंकाळी ते सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन असेल. गोव्यात सध्या दर २४ तासांत दोन हजार नवे रुग्ण आढळतात व तीस कोरोनाग्रस्तांचा जीव जात आहे. त्यामुळे सरकारमधील आणि काही विरोधकांनी लॉकडाऊनची मागणी केली होती. सावंत सरकारवर राजकीय दबाव आला होता. अखेर त्यांनी लॉकडाऊन जाहीर केला.