Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 09:26 AM2020-03-26T09:26:32+5:302020-03-26T09:28:23+5:30
Coronavirus : 600 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. वाढणारा हा आकडा चिंतेचा विषय असून यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
तिरुवनंतपुरम – जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. भारतातही आतापर्यंत एकूण 12 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर 600 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. वाढणारा हा आकडा चिंतेचा विषय असून यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे. केरळच्या कासारगोडमध्ये हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कासारगोडमधील कोरोनाग्रस्त व्यक्ती ही काही मिनिटांसाठी चार जणांच्या संपर्कात आली होती. त्यानंतर या एका व्यक्तीमुळे 20 मिनिटांत 4 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कासारगोडचे जिल्हाधिकारी डी. संजीत बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तामुळे 4 जणांना व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. ही व्यक्ती दुबईहून भारतात आली होती. 16 मार्चला त्याला कोरोना व्हायरस असल्याचं निदान झालं.
धक्कादायक! कोरोनामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; वयोवृद्ध, बालकांसह युवकांनाही वाढला धोका#CoronavirusLockdownhttps://t.co/69vE3sfWBh
कोरोनाची चाचणी झाल्यावर या व्यक्तीला घरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. तो स्वत:ला आयसोलेट करून घेण्यापूर्वी 20 मिनिटांमध्येच त्याने तब्बल 4 जणांना कोरोना संक्रमित केल्याची माहिती समोर आली आहे. आयसोलेशनपूर्वी विमानतळाहून कारमधून घेऊन जाणारा मित्र, त्यानंतर घरी आई, पत्नी आणि मुलगा त्याच्या संपर्कात आले. हे चारही जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांवरही आता उपचार सुरू करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासाhttps://t.co/n10HRrVL0g
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4,27,940 वर पोहोचली असून, बळींची एकूण संख्या 21,000 हून अधिक इतकी झाली आहे.जगभरातील 181 देशातील ही संख्या आहे. यामध्ये युरोपमधील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 226340 पेक्षा अधिक तर बळींची संख्या 12719 इतकी आहे. जगातील आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी सांगितले की, सध्या युरोप हा कोरोना साथीचे केंद्र बनला असला, तरी अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अमेरिका या साथीचे नवे केंद्र बनण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
coronavirus : लॉकडाऊनदरम्यान भाजपाने उचलले मोठे पाऊल, रोज पाच कोटी गरिबांना देणार भोजन
Coronavirus : देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासा
Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली ६०० च्या पुढे; तामिळनाडूत पहिला मृत्यू