नवी दिल्ली : देशामध्ये नव्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या महिनाभरात प्रथमच नऊ लाखांपेक्षा कमी झाला आहे. शुक्रवारी कोरोनाचे ७०,९४६ नवे रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या ६९ लाखांवर पोहोचली आहे, तर ५९ लाख सहा हजारांहून अधिक लोक कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत.964 जण आणखी मरण पावले असून बळींची एकूण संख्या 1,06,490 झाली. एकूण रुग्णसंख्या 69,06,151 तर बरे झालेल्यांची संख्या 59,06,069 वर पोहोचली. बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 85.52% इतके आहे.8,93,592 रुग्णांवर देशात उपचार सुरू. ही एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 12.94% आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.54% इतका कमी आहे. ८ आॅक्टोबरला 11,68,705 चाचण्या करण्यात आल्या. 8,46,34,680 इतक्या एकूण चाचण्या झाल्या.जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३,६८,००,२७५ झाली आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत ७८,३४,००० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. भारतामधील कोरोना रुग्णसंख्या ही अमेरिकेतील रुग्णांपेक्षा सुमारे ११ लाखांनी कमी आहे.पद्मनाभस्वामी मंदिरातील १० पुजाऱ्यांना बाधाकेरळमधील पद्मनाभस्वामी या प्रख्यात मंदिरातील १२ पैकी १० पुजाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे हे मंदिर १५ आॅक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच भाविकांना ते दर्शनासाठी खुले होईल.या देवळाचे दोन्ही मुख्य पुजारी कोरोनाने आजारी आहेत. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये या देवळाच्या दोन सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे.
CoronaVirus News: दिलासादायक! उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या १ महिन्यानंतर ९ लाखांच्या खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 2:37 AM