नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,33,533 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 525 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,89,409 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये कोरोना मृतांच्या आकड्याने टेन्शन वाढवलं आहे. उज्जैनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोणत्याही पॉझिटिव्ह रुग्णाला भीती वाटणे आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याची तक्रार असेल, तर त्याने ताबडतोब रुग्णालयात पोहोचावे. उज्जैन विभागात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शेकडो पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तिसऱ्या लाटेत मृत्यूचा आलेख खाली येईल असे मानले जात होते, पण हळूहळू कोरोनामुळे मृत्यूचा आकडा सुरूच आहे. उज्जैनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे डॉक्टरांकडून सातत्याने खबरदारी घेण्याचे निर्देश दिले जात असले तरी त्याचे पूर्ण पालन केले जात नाही.
कोरोना स्पेशालिस्ट डॉ रौनक एलची यांच्या मते, तिसऱ्या लाटेतही काही पॉझिटिव्ह रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत आहे. उज्जैनमध्ये एकापाठोपाठ दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डॉ. एलची यांनी सांगितले की, जर एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची पातळी कमी होत असेल आणि त्याला काही समस्या येत असतील, तर त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. सध्या बहुतेक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. उज्जैनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 173 वर गेली आहे.
उज्जैनचे डीएम आशिष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. उज्जैन 6 लाख 34 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच उज्जैन विभागाबाबत बोलायचे झाले तर 10,000 हून अधिक लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे. यातील अनेकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. असे असूनही लोक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत. त्यामुळे हा कोरोना सातत्याने वेगाने पसरत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे