CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! 5 दिवसांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू; आई निगेटिव्ह अन् बाळ पॉझिटिव्ह, डॉक्टरही हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 08:17 AM2022-01-23T08:17:17+5:302022-01-23T08:24:29+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होत आहे. कोरोनामुळे अवघ्या पाच दिवसांचा बाळाने आपला जीव गमावला आहे.
नवी दिल्ली - भारतातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होत आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे अवघ्या पाच दिवसांचा बाळाने आपला जीव गमावला आहे.
ग्वाल्हेरमध्ये कोरोनामुळे अवघ्या 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मुलीच्या जन्मानंतर आई आणि बाळाची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी हा खुलासा झाला. मुलीच्या जन्माच्या तीन दिवसांनंतर ती आजारी असल्याने तिला ग्वाल्हेरच्या कमलाराजा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. येथे 2 दिवस मुलीवर उपचार सुरू होते. यानंतर मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मुलीच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्यामुळे आरोग्य विभाग हैराण झाला.
गेल्या 24 तासांत 927 मुलं कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासनाच्या चिंतेत भर
आरोग्य विभागाकडून कुटुंबातील अन्य सदस्यांच्या टेस्ट केल्या जात आहे. याशिवाय ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिव्हील सर्जन, स्त्री विभागातील एचओडीसह 12 हून अधिक डॉक्टर आणि नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लहान मुलांना देखील आता कोरोनाचा संसर्ग होत आहे. ओडिशामध्ये तब्बल 927 मुलांना तर भोपाळमध्ये 170 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ओडिशामध्ये शनिवारी संसर्गाची 8,845 नवीन प्रकरणे आढळल्यानंतर, येथील एकूण संक्रमित लोकांची संख्या 11,96,140 झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये 927 मुले देखील आहेत.
170 मुलं कोरोना पॉझिटिव्ह
मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 11274 कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत. काल हा आकडा 9385 होता. भोपाळच्या नवीन प्रकरणांमध्ये, एका दिवसात 170 मुलं पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्य सरकार देखील सतर्क झाले आहे. रुग्णालयात बालरोग वैद्यकीय सेवा वाढविण्यात येत आहेत. मध्य प्रदेशमध्ये संसर्ग दर 12% पर्यंत वाढला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.