नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.
कोरोनामुळे एक हसतं-खेळतं घर काही दिवसांत उद्ध्वस्त झालं आहे. घरामध्ये लेकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बरेलीमध्ये एका प्रोफेसर आणि त्यांच्या पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मन सुन्न करणारी बाब म्हणजे त्यांच्या मुलीचं 2 मे रोजी लग्न होतं. मुलीचं लग्न असल्याने आई-वडील खूप खूश होते. पण त्याआधीचं त्यांचा मृत्यू झाल्याने लग्नाच्या घरातून अंत्ययात्रा निघाल्या आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
2 मे रोजी मुलीचं लग्न असल्याने सर्व कुटुंब खूप आनंदी होतं. तयारी सुरू होती. त्याच दरम्यान 7 एप्रिल रोजी शर्मा आणि त्यांच्या पत्नीमध्ये कोरोनाची काही लक्षणं आढळून आली आहेत. त्यानंतर त्यांच्यावर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान 13 एप्रिल रोजी ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली असतानाच पत्नीचा मृत्यू झाला तर त्यानंतर 16 एप्रिलला पतीचा देखील मृत्यू झाला. ज्या घरातून वरात निघणार होती त्या घरातून अंत्ययात्रा निघाल्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनामुळे अनेकांना आपल्या घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्य़ू झाला आहे. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडला. त्यामुळे चार दिवसांत एकाच घरातून तीन अंत्ययात्रा निघाल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील सिकंदरा गावामध्ये एकाच घरात चार दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी 31 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.