Karnataka Lockdown: कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमध्ये १४ दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी केली आहे. राज्यात कोरोना प्रादुर्भावाची साखळी मोडण्यासाठी १० ते २४ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १० मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते २४ मेच्या सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. (Coronavirus live updates Complete lockdown in Karnataka from May 10 to May 24)
कर्नाटकमध्ये फक्त कर्फ्यू लावूनही उपयोग होत नाहीय. कर्फ्यू लादूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, असं येडियुरप्पा म्हणाले. कर्नाटकात गेल्या २४ तासांत ४८ हजार ७८१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २८ हजार ६२३ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत आणि ५९२ जणांनी जीव गमावला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १८ लाख ३८ हजार ८८५ इतकी झाली आहे. तर ५ लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत.
कर्नाटकात ४ तासांसाठी उघडणार जीवनावश्यक वस्तूंची दुकानंकर्नाटकातील लॉकडाऊन काळात नेमकं काय सुरू राहणार आणि काय बंद याची माहिती देण्यात आली आहे. यात राज्यातील सर्व हॉटेल्स, पब्स, बार बंद राहणार आहेत. तर आवश्यक खाद्यपदार्थांची दुकानं सुरू राहणार आहेत. यात रेस्टॉरंट्स, मांस विक्री, भाज्यांची दुकानं सकाळी ६ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कामगार आणि मजुरांना घाबरून न जाता स्थलांतर न करण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारकडून मजुरांची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे.