नवी दिल्ली - कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांनी या संकटात आपल्या जवळची माणसं गमावली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे एका कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे.
कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समस्तीपूरच्या नगरगामा येथील मंजीत कुमार यांना गेल्या महिन्यात कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी डिप्रेशनमध्ये गेली आणि 31 वर्षीय रीता कुमारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रीता यांना दीड महिन्यांचं बाळ आणि तीन वर्षांचा एक मुलगा आहे. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे आता ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजीत यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी डिप्रेशनमध्ये गेली होती. बुधवारी आपल्या मुलांसोबत त्या एका खोलीत झोपल्या होत्या. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांची मुलं खोलीबाहेर होती आणि त्या एकट्याच आत होत्या. दुपारी दरवाजा वाजवून त्यांना बाहेर बोलवण्यात आलं. मात्र त्या बाहेर आल्या नाही. शेवटी दरवाजा तोडला असता त्यांनी खोलीतील पंख्याला लटकून गळफास घेतल्याचं दिसलं. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! कोरोनाने चिमुकल्याचं 90% फुफ्फुस झालं खराब पण तरीही टेस्ट निगेटिव्ह; डॉक्टरही हैराण
कोरोनामुळे एका मुलाचं फुफ्फुस हे 90 टक्के खराब झालं आहे. मात्र त्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याची हैराण करणारी बाब समोर आली आहे. या घटनेमुळे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे आहे. तसेच त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिहारमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. पाटणाच्या IGIMS मध्ये एका 8 वर्षांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. त्याचं 90% फुफ्फुस खराब झालं आहे. किडनी आणि लिव्हरही संक्रमित झालं आहे. पण त्याची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली, अँटिजेन टेस्ट केली. पण दोन्ही टेस्टमध्ये कोरोनाचं निदान झालं नाही. दोन्ही टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सिटी स्कॅनमध्ये त्याच्या कोरोनाचं निदान झालं, सिटी स्कॅन रिपोर्ट पाहून तर डॉक्टरांना धक्काच बसला.