नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,08,74,376 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37,154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 724 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,08,764 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मात्र काही राज्यांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना मृतांच्या संख्येने प्रशासनाची चिंतेत भर टाकली आहे. याच दरम्यान एकाच कुटुंबातील 20 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना रुग्ण आढळून आलेल्या परिसरात ट्रेसिंग आणि टेस्टिंग वेगाने केले जावेत जेणेकरून बाधित लोकांचा शोध घेणं सोपं होईल यासाठी निर्देश दिले आहेत. कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून ते एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे 125 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे, याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. आरोग्य विभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार या घटनेवरुन उघड झाला आहे. एका महिलेला कोरोना (Corona Vaccination) लसीचा पहिला डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला होता. झारखंडची राजधानी रांचीमध्ये रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार या घटनेवरुन उघड झाला आहे. एका महिलेला कोरोना (Corona Vaccination) लसीचा पहिला डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला होता. या घटनेनंतर महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना रांचीच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बरियातू रोड (Bariatu Road) येथे घडली आहे.
रांचीमधील शिवाजी नगर येथे राहणाऱ्या शीला देवी या लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रांचीच्या बरियातू रोड येथील एडवान्स डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेल्या. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेला कोवॅक्सिनऐवजी कोविशिल्डची लस दिली गेली. कोविशिल्डची लस घेतल्यानंतर लगेचच त्या महिलेची प्रकृती ढासळली आणि त्यानंतर महिलेस एडवान्स डायग्नोस्टिक सेंटरने रांचीच्या मेडिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेचा मुलगा चंदन याने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनाची लस घेतल्यानंतर आईला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली." यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एकच गोंधळ घातला. कुटुंबियांनी घातलेल्या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीसीआर 9 च्या पोलिसांनी महिलेच्या कुटुंबियांना शांत करत परिस्थिती हाताळली.