नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 89,129 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 714 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,23,92,260 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,64,110 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा कहर अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत असून भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दुर्ग जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचा ढीग लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या अचानक वाढल्याने स्मशानभूमी आणि दफनभूमीत सध्या जागा उपलब्ध होत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आधी दोन ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मागील दोन दिवसांत मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले आहेत. त्यामुळे दोन ते तीन ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती दुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (3 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 89,129 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे.
कोरोनाचा प्रकोप! 'या' देशात मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही; कबरींतून उकरून काढावे लागले सांगाडे
ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सर्वात मोठं शहर असलेल्या असलेल्या साओ पाउलोमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह दफन करण्यासाठी कब्रिस्तानमध्ये आता जागाच शिल्लक राहिलेली नाही. कोरोनामुळे भयावह परिस्थिती असून कर्मचाऱ्यांकडून जुने सांगाडे बाहेर काढण्यात येत आहेत आणि त्याठिकाणी नवीन मृतदेहांसाठी जागा तयार केली जात आहे. गेल्या एका आठवड्यात ब्राझीलमध्ये जवळपास 60 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. काही वर्षांपूर्वी दफन केलेल्या कबरींवरील वरील भाग काढण्यात येत असून तेथील सांगाडे काढण्यात येत आहे. साओ पालोमधील ब्राझीलमधील सर्वात मोठ्या कब्रस्तानापैकी एक असलेल्या विला फोरमोसा सिमेट्रीमध्ये कर्मचारी मास्क, पीपीई किट घालून दिवस-रात्र कबर खोदत आहेत.