CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 07:34 PM2021-09-18T19:34:55+5:302021-09-18T19:40:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

CoronaVirus Live Updates husband died due to corona wife in depression committed suicide | CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांनी या संकटात आपल्या जवळची माणसं गमावली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. 

कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपा सक्सेना असं या महिलेचं नाव असून तिचे पती सुदेश सक्सेना यांचा काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर दीपा अत्यंत दु:खी झाली होती. ती एकटीच आपल्या खोलीमध्ये असायची. सकाळी खूप वेळ झाला तरी दीपा आपल्या खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. 

...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! 

खोलीचा दरवाजा उघडताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दीपा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. नातेवाईकांनी लगेचच पोलिसांना या धक्कादायक घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दीपा एका खासगी कंपनीत काम करायची. तिला दोन मुलं आहेत. मात्र पतीच्या मृत्यूनंतर तिने मुलांना आपल्या माहेरी सोडलं होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना तपासणी केंद्रावर मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात किट अडकल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अर्ध्या तासात महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

निष्काळजीपणाचा कळस! कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात अडकलं किट; अर्ध्या तासात तडफडून मृत्यू

महिलेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. कोणत्यातरी आजारामुळे मृत्यू झाला असेल असं म्हटलं आहे. या घटनेने गावात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. राम बहाद्दूर दास यांची 65 वर्षीय पत्नी जासो देवी यांचा मृत्यू झाला आहे. राम बहाद्दूर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कोरोना लस घेण्यासाठी गेली होती. मात्र लस घेण्याआधी तिला कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आलं. त्यावेळी जेव्हा त्यांच्या तोंडामध्ये तपासणीसाठी किट घालण्यात आलं तेव्हा ते गळ्यामध्येच अडकून राहीलं.

Web Title: CoronaVirus Live Updates husband died due to corona wife in depression committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.