नवी दिल्ली - जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 10,229 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (15 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,44,47,536 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,34,096 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 4,63,655 जणांनी आपला जीव गमावला आहे.
देशात 3,38,49,785 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 1,12,34,30,478 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. कोरोनावर जगभरात संशोधन सुरू आहे. युरोपच्या काही भागातील परिस्थिती ही चिंताजनक आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. मात्र तरी देखील वेगाने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे प्रशासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युरोपच्या ऑस्ट्रियामध्ये लस न घेणाऱ्यांविरोधात एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. सरकारने अशा लोकांसाठी लॉकडाऊन लावला आहे. ज्या लोकांनी ऑस्ट्रियामध्ये कोरोनाची लस घेतली आहे. त्यांना सुविधा देण्यात येत आहेत.
कोरोनाचा धसका! लसीकरण नाही तर स्वातंत्र्य नाही; 'या' देशात लस न घेणाऱ्यांसाठी लॉकडाऊन
लसीकरण झालेल्या लोकांनी रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये जाता येत असून तिथे सुविधा देण्यात येत आहेत. मात्र ज्य़ा लोकांनी कोरोना लस घेतलेली नाही त्यांना घरामध्येच राहावं लागणार आहे. त्यांना फक्त जीवनावश्यक वस्तू आणण्याची आणि डॉक्टरांकडे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या लोकांना आता कोरोनाची लागण झाली आहे आणि अजूनही ते बरे झालेले नाहीत अशांना देखील लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार आहे. ऑस्ट्रियाचे चान्सलर एलेझेंडर शालेनबर्ग यांनी या कठोर नियमांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रियामध्ये सीमित लोकांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच लसीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग चांगला असून आतापर्यंत 65 टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.