नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 224 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 14,313 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (12 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,39,85,920 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,14,900 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 4,50,963 जणांनी आपला जीव गमावला आहे.
रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर
देशात 3,33,20,057 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 95,89,78,049 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. कोरोनावर जगभरात संशोधन सुरू आहे. संशोधनातून आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी होत असल्याचं आता समोर आलं आहे. अशा रुग्णांमध्ये कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता देखील सामान्य रुग्णांपेक्षा 43 टक्के कमी आहे. लॅन्सेट ई क्लिनिकल मेडिसिन या संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे.
18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6,195 रुग्णांवर संशोधन
अमेरिकेतील मिनीसोटा विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बेसेल विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला, अमेरिकेतील 12 रुग्णालये आणि 60 क्लिनिकमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 6,195 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले. सर्व रुग्ण 4 मार्च ते 27 ऑगस्ट 2020 दरम्यान कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. संशोधकांनी रक्ताच्या गुठळ्या नसलेले पण उपचार घेत असलेले रुग्ण आणि कोरोना मृत्यूची शक्यता यांच्यातील नेमक्या संबंधांचा अभ्यास केला. यामध्ये जे रुग्ण कोरोना ग्रस्त होण्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेत होते त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 43 टक्के कमी होती असं आढळून आलं आहे. संशोधकांनी कोरोना आधी किंवा त्यापूर्वी रक्त पातळ करणारी औषधे घेतलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी दिसून आल्याचं म्हटलं.
आणखी वाचा
रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी; रिसर्चमधून मोठा खुलासा
अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि भेटवस्तू, तेल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी मोठ्या रांगा