नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 13 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,84,372 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,027 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,38,73,825 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,72,085 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (14 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एक लाख 84 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांच्यावर पोहोचला आहे.
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 13,65,704 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,23,36,036 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 90% टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयाच्या (JHU) आकडेवारीनुसार, सर्वाधिक बाधित रुग्णांच्या बाबतीत भारतानेस ब्राझीलला मागे टाकलं आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1,34,82,023 रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,11,98,055 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. तर, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 कोटी 61 लाखांवर पोहोचला आहे.
बापरे! अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; देण्यात आलं Remdesivir इंजेक्शन, प्रकृती चिंताजनक
कोरोनाच्या संकटात आणखी एक धक्कादायक माहिती मिळत आहे. एका अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरातच्या सूरतमधील बाळाला कोरोनाची लागण झाली असून ती चिमुकली सर्वात कमी वयाची कोरोना रुग्ण आहे. 11 दिवसांची एक चिमुकली आपल्या जन्माच्या पाचव्या दिवसापासून कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. नवजात बाळ आईच्या संपर्कात आल्याने कोरोना संक्रमित झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. अमरोली भागातील एका 30 वर्षीय महिलेला 1 एप्रिल रोजी डिलिव्हरीसाठी डायमंड रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी महिलेने चिमुकलीला जन्म दिला.