नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 56 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (16 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20,044 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,25,660 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यांतील प्रशासनाचं टेन्शन वाढवलं आहे. या पाचही राज्यात नव्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्यानंतर केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि ओडिशाचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये जवळपास 58.72 टक्के नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसच्या नवीन सब व्हेरिएंटने आता पुन्हा एकदा देशातील शास्त्रज्ञांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाचा हा नवीन सब व्हेरिएंट सध्याच्या तपास पद्धतींना चकवा देऊ शकतो.
सध्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजेन किटद्वारे चाचणी केली जात आहे. नवी दिल्लीस्थित IGIB च्या संशोधकांचा असा विश्वास आहे की कोरोनाचे सर्व प्रकार समोर आल्यानंतर चाचणी पद्धतींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. लॅबमध्ये कोरोना चाचणी किटसह फ्रिक्वेन्सी तपासल्यानंतर ही माहिती प्राप्त झाली आहे. देशातील बहुतांश राज्ये सध्या रॅपिड अँटीजन किट वापरत आहेत. तर कोरोना BA.4, BA.5 आणि BA.2.75 चे नवीन सब व्हेरिएंट कोरोना चाचणीच्या पॅरामीटर्सवर परिणाम करू शकतात. इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांमध्ये असे दिसून आले आहे की रॅपिड अँटीजेनच्या वापरामुळे तेथे संक्रमणाचे स्त्रोत गायब झाले आहेत.