नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत पाच दिवसांनी आता घट झाली आहे. मात्र काही ठिकाणी अद्यपही परिस्थिती चिंताजनक आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 30,941 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 350 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 4,38,560 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (31 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,70,640 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,19,59,680 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांची चिंता वाढली आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना ब्लॅक फंगसचा देखील धोका आहे. तसेच संसर्गाचे हृदय, डोळे आणि फुफ्फुसांनंतर गंभीर परिणाम होत आहेत. यानंतर आता कोरोना कानावर अटॅक करत असल्याची धडकी भरवणारी माहिती मिळत आहे.
बापरे! डोळे आणि फुफ्फुसांनंतर आता कोरोना कानावर करतोय 'अटॅक'; ऐकण्याची क्षमता होतेय कमी
कान दुखणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कान जड होणे, घंटी किंवा शिटी वाजवल्यासारख्या आवाजाचा भास होणं अशा समस्या आता रुग्णांमध्ये आढळून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे रुग्णांना नीट झोप देखील लागत नाही. डॉक्टरांच्या मते हा कोरोनाचा नवा स्ट्रेन ड़ेल्टा व्हेरिएंट असू शकतो. रुग्णांमध्ये सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस पाहायला मिळत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे हा त्रास होतो. कोरोना व्हायरस नाकाच्या माध्यमातून इम्यून सिस्टमवर अटॅक करतो. नाक आणि कान हे कनेक्टेड असतात. जे इन्फेक्शन नाकात असतं ते पुढे कानात जातं. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनने रिएक्शन होतं. कान डॅमेज होऊ शकतो. किशनगड-रेनवालचे निवासी असलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना संक्रमण झाल्यानंतर एक महिन्यांनी अचानक कानाने ऐकू येणंच बंद झालं. याला मेडिकल भाषेत सडन सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस असं म्हटलं जातं. यासाठी रुग्णाला ऑक्सिजन थेरपी दिली जाते.