नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ देखील होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. 14 दिवसांनी नव्या रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. कोरोनाबाबत सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 31,222 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (7 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 3,30,58,843 पोहोचली आहे. तर 4,41,042 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,92,864 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. असं असताना तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. संशोधनातून कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत असते. तज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतात जर नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचं मत आता तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः धुमाकूळ घातला. देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी'
अजूनही दुसरी लाट पूर्णतः ओसरलेली नसून केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी याबाबत आता महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. भारतात येऊन गेलेली कोरोनाची दुसरी लाट ही डेल्टा व्हायरसमुळेच आली होती. त्यामुळे अनेकांना डेल्टाची लागण होऊन गेली असून हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं मत डॉ. गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे. भारतीयांना आता डेल्टा व्हायरसची फारशी भीती नसून जर कुठलाही नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेची फारशी भीती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भारतीयांच्या शरीरात या व्हायरसविरोधात अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत.