नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (23 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,33,533 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,89,409 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 93.18 टक्क्यांवर आहे. लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा देशातील अनेक ऱाज्यांमध्ये संसर्ग झाला आहे. काही राज्यांनी वाढता धोका लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या ही दहा हजारांवर गेली आहे. तर दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लगेगच पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. जर एखाद्याला एकदा कोरोना झाला असेल तर त्याला पुन्हा संसर्ग होण्यास वेळ लागतो असं म्हटलं जातं. बाधितांच्या शरीरात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार केल्या जातात आणि त्या त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतात. पण आता वेगळी माहिती समोर आली आहे.
पुन्हा पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचे कारण स्पष्ट करताना, एम्सचे लसीकरण प्रभारी डॉ. संजय रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनच्या आधी कोरोना हा पुन्हा होण्याचा धोका खूप कमी होता. पण आता तसं नाही. 2020 मध्ये जेव्हा भारतातही लोकांना कोरोनाची लागण होऊ लागली. तेव्हा धारावीसारख्या अनेक भागात दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. पण आता तिथेही बातम्या येत नाहीत. कारण कोरोनाचे आतापर्यंतचे सर्व प्रकार अतिशय धोकादायक होते, जे एकदा झाले की त्याच्याशी दीर्घकाळ लढण्याची प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण होते. पण ओमायक्रॉन सामान्य सर्दी फ्लू सारखा आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, अशा परिस्थितीत ते शरीरात अँटीबॉडीज तयार करू शकत नाही, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा कोरोना होऊ शकतो. संजय राय यांनी सांगितले की मानवी शरीरात नैसर्गिक इंजेक्शन म्हणजेच कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी स्वतःची प्रतिकारशक्ती उत्तम काम करते.