नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे २८१२ जणांचा मृत्यू झाला. तसेच २ लाख १९ हजार २७२ रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नवे रुग्णांची नोंद होत आहे. (India reports 3,52,991 new COVID19 cases, 2812 deaths and 2,19,272 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ झाली असून, त्यातील १ कोटी ४३ लाख जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत १ लाख ९५ लाख १२३ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ इतकी आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल १४ कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर आता कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. याशिवाय, देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवर वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अमेरिकेमध्ये ३ कोटी २७ लाख कोरोना रुग्ण जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १४ कोटी ७१ लाख असून त्यातील १२ कोटी ४७ लाख लोक बरे झाले आहेत. तसेच ३१ लाख लोकांचा बळी गेला आहे. जगामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या अमेरिकेमध्ये ३ कोटी २७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील २ कोटी ५३ लाख जण बरे झाले तर ५ लाख ८५ हजार जणांचा बळी गेला. या देशात ६८ लाख उपचाराधीन रुग्ण आहेत. ब्राझिलमध्ये कोरोना बळींची संख्या ३ लाख ८९ हजार असून ती भारतापेक्षा जास्त आहे.