नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल चार कोटींवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज चार हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. बुधवारी (8 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 5233 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,24,715 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. .
गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील दोन राज्यांनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे. सातत्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या रुग्णांची सर्वाधिक नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 1,383 आणि महाराष्ट्रात 1036 रुग्ण सापडले आहेत. एकूण नव्या रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे फक्त या दोन राज्यातील आहेत. तसेच देशातील कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे.
कोरोनाचा कहर! मुंबईकराचं टेन्शन वाढलं; 5 दिवसांत रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात म्हणावी की नाही हे सांगणे घाईचे ठरेल. जोपर्यंत कोणताही नवीन व्हेरिएंट येत नाही, तोवर नवीन लाटेची शक्यता खूप कमी असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालून लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.