नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ देखील होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 67 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (10 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,084 अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 5,06,520 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे
कोरोनाच्या संकटात पाच राज्यांनी चिंता वाढवली असून तेथील परिस्थिती ही गंभीर आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थानचा समावेश आहे. केरळ (23,253), महाराष्ट्र (7,142), कर्नाटक (5,339), तामिळनाडू (3,971) आणि राजस्थान (3,728) नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण नव्या रुग्णांपैकी 67.75 टक्के रुग्ण याच पाच राज्यांतील आहेत. यामध्ये केरळमधील रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. तर दुसरीकडे दिल्लीमधील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आता कोरोनाच्या संकटात एक धोक्याचा इशारा दिला आहे. अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, ओमायक्रॉननंतर आता कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट हा अधिक संसर्गजन्य असू शकतो असं म्हटलं आहे.
डेल्टा, ओमायक्रॉन... कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य?; WHOचा धोक्याचा इशारा
डब्ल्यूएचओच्या डॉ. मारिया वान केरखोव यांनी कोरोना अद्याप गेलेला नाही. त्याचा नवीन व्हेरिएंट आणखी संसर्गजन्य असेल, कारण तो इतर व्हेरिएंटना मागे टाकेल. हा सौम्य आणि गंभीर दोन्ही असू शकतो आणि आपली प्रतिकारशक्ती कमी करू शकतो असं म्हटलं आहे. कोणत्याही व्हायरसमध्ये कालांतराने बदल होतात, ज्यामुळे तो निसर्गात टिकून राहू शकतो. बहुतेक व्हायरस त्यांच्या गुणधर्मांमध्ये फारसा बदल करत नाहीत, परंतु काही व्हायरस आहेत ज्यात लस आणि उपचारांशी लढा दिल्याने ते बदलतात. आतापर्यंत 5 व्हेरिएंट्स आहे. यामध्ये अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमायक्रॉन VoC घोषित केले गेले आहेत. ते माणसांमध्ये त्यांच्या वेगाने प्रसारासाठी, त्यांना गंभीरपणे संक्रमित करण्यासाठी आणि त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत.