शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus Live Updates : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 9 महिन्यांनी नव्या रुग्णांच्या संख्येत झाली मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 11:30 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे.

नवी दिल्ली - कोरोनाने अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने 25 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 254,589,978 वर पोहोचली आहे. तर 5,122,004 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील 230,190,379 जण कोरोनातून बरे झाले आहेत. याच दरम्यान भारतातही कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. तब्बल 9 महिन्यांनी नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 8,865 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (16 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,30,793 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कोरोनाचा धसका! लसीकरण नाही तर स्वातंत्र्य नाही; 'या' देशात लस न घेणाऱ्यांसाठी लॉकडाऊन

संपूर्ण जगालाच कोरोनाने विळखा घातला आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वच देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. युरोपमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. युरोपच्या काही भागातील परिस्थिती ही चिंताजनक आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. मात्र तरी देखील वेगाने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे प्रशासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युरोपच्या ऑस्ट्रियामध्ये लस न घेणाऱ्यांविरोधात एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. सरकारने अशा लोकांसाठी लॉकडाऊन लावला आहे. ज्या लोकांनी ऑस्ट्रियामध्ये कोरोनाची लस घेतली आहे. त्यांना सुविधा देण्यात येत आहेत.

लसीकरण झालेल्या लोकांनी रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये जाता येत असून तिथे सुविधा देण्यात येत आहेत. मात्र ज्य़ा लोकांनी कोरोना लस घेतलेली नाही त्यांना घरामध्येच राहावं लागणार आहे. त्यांना फक्त जीवनावश्यक वस्तू आणण्याची आणि डॉक्टरांकडे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या लोकांना आता कोरोनाची लागण झाली आहे आणि अजूनही ते बरे झालेले नाहीत अशांना देखील लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार आहे. ऑस्ट्रियाचे चान्सलर एलेझेंडर शालेनबर्ग यांनी या कठोर नियमांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रियामध्ये सीमित लोकांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच लसीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग चांगला असून आतापर्यंत 65 टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत