नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 89,129 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 714 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,23,92,260 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,64,110 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (3 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 89,129 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे.
‘सीरम’कडून लस विकत घेण्यास परवानगी द्या, युराेपियन समुदायाचे केंद्राकडे आर्जव
युराेपमध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, फ्रान्ससह काही देशांमध्ये लाॅकडाऊन लागले आहे. त्यामुळे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडून ‘ॲस्ट्राझेनेका’ने विकसित केलेल्या लसीचे 10 काेटी डाेस विकत घेण्यास परवानगी देण्याची विनंती युराेपियन समुदायाने केंद्र सरकारकडे केली आहे.